Tuesday, July 27, 2010

एक होती प्रजा

आटपाट नगर होतं
नगराचा एक राजा होता
राजाला तीन राण्या
तिघिना एक एक राजपुत्र
राजा नपुंसक होता
बाकि सगळं व्यवस्थीत चालल होतं

राजवाडयामागे खोल विहीर होती
बारा महीने भरलेली असायची
सर्वात मोठ्या राणीने तिच्यात
जीव दिला होता असं म्हणायचे
नगरातल्या शेतकरयाशी तिचे
संबंध होते असही म्हणायचे
पण आता असं कुणी म्हणत नाही
दर अमावशेला सगळी प्रजा
एक एक हंडा पाणी विहिरीत ओतते
जुनी गोष्ट आहे इतकच म्हणतात
बाकि सगळं व्यवस्थीत चाललय

दरबारात एक प्रधान होता
राजवाड्याशी त्याचे घरचे संबंध
दरबारात तो फारसा नसायचा
पण राजवाड्यातल कमी जास्त
सगळ तोच बघायचा
प्रधानाची बायको हुशार
प्रधानाचा संसार राजेशाही ठेवायची
तीन वेळा का होइना
पण प्रधान राजा बनला होता ना!
प्रधानाचा संसार ही व्यवस्थित चालला होता

दरबारात एक सेनापतिही होते
राजाची कुणाशी दुश्मनीच नव्हती
राज्यातला सगळा कर
सेनापति गोळा करायचे
राज्यातली सारी न्याय-व्यवस्था
सेनापतीच बघायचे
न्याय-व्यवस्था न माननारी लोकं
सेनेत भरती व्हायची
बाकि सगळं व्यवस्थीत चालल होतं

आणि उरले राज-ज्योतिषी
त्यांच्या परवानगी शिवाय तर
नगराच पानही नाही हलायच!
प्रजेच उज्जवल भविष्य
तेच तर ठरवायचे!
नवीन रस्ते, नवीन राजवाडा
कधी कुठे बांधायचे, हे
सेनापती त्यानाच 'विचारायचे'
त्यांच्या आशीर्वादानेच तर
नगराची भरभराट होत होती

ते आटपाट नगर होत
नगराचा एक राजा होता
'राजा नपुंसक होता
हे फ़क्त राजालाच माहिती होतं'
असंच सगळे म्हणायचे!
-भावीन

No comments: