Saturday, June 20, 2009

रंग

प्रत्येक वर्षाचा किंवा काळाचा रंग असतो असं मला कधी लक्षातंच आलं नाही। पण आज 'सकाळ' मध्ये एक लेख वाचताना अचानक मला ते सगळं वर्णन black & white मध्ये दिसायला लागलं ! त्यातील काही वाक्यं अशी होती:
"१९७२-७३ ला स्वयंचलीत वाहनं अत्यन्त अल्प स्वरूपात होती। मी माझी सायकल पुण्याहून नाशिकला नेली होती। नाशिक मध्ये रविवार कारंजा नांवाचा अत्यन्त गजबजलेला एक मोठा चौक होता। तिथून आम्ही double-seat जात होतो।" वगैरे वगैरे।
आता हे वाचताना पहिल्या वाक्यातंच माझ्या कल्पनेतून सगळे रंग उडून गेले! १९७२, स्वयंचलीत वाहनं नसणं हे सगळं मी रंगांमध्ये imagine च करू शकत नाही! त्या काळी रंग नव्हते असं नाही, पण त्या काळचं जे काही photo, films, prints etc पहायला मिळालंय ते सगळं black & white! त्यामुळे १९७२ हे वर्ष रंगीत म्हणजे नक्की कसं असेल हे imagine करणं फार कठीण! पुन्हा "मी माझी सायकल पुण्याहून नाशिकला नेली होती" हेसुद्धा आज पचायला जड़ जातं। आणि सर्वांत कड़ी म्हणजे १९७२ साली रविवार कारंजा 'अत्यन्त गजबजेला' म्हणजे नक्की कसा असेल? एकंदर हे सगळं वर्णन तपशिलात imagine करणंच इतकं कठिण होतं की त्यात रंग भरण्यापेक्षा थोडासा अंधार,थोडासा पांढरा उजेड आणि एक सायकल इतकच चित्र मला त्या स्वयंचलीत वाहनांविना गजबजलेल्या रविवार कारंज्याचं दिसलं !

No comments: