Sunday, August 29, 2010

क्षण एक थांबण्याचा.....

त्या एका क्षणाला,
वारा वाहायचा थांबतो,
पानांची सळसळ थांबते,
झाडाखाली उतरलेला कावळा
कावरा बावरा होउन बघत राहतो.
उगीच दोन तीन काळे ढग
आकाशात रेंगाळत राहतात.
पाउस नाही पडत,
पण थोडं शहारून येतं.
मन उभ्या उभ्या हरवतं,
भूत - वर्तमानाचा गुंता होतो,
न सोडवावासा वाटणारा.
काही कळेनासं, काही कळू नए असं वाटतं.
मन आणि शरीर, दोघेही स्तब्ध होतात,
सगळ कसं शांत होतं, थांबतं.

ह्या सगळ्यांपासून अनभिज्ञ
डोळ्यांतलं पाणी तेवढं वाहत राहतं!

त्या एका क्षणाला.........

- भावीन

2 comments:

Anushree Vartak. अनुश्री वर्तक said...

hey reg valvaacha paaus, no luck, but i think it means untimely

bhavin said...

yes, I got it... untimely, mostly in summer!
thank you.
:)