Friday, February 11, 2011

जीव गुंतला असा...

जीव गुंतला असा
की शब्द तुझेच ऐकले,
गाणे दाटले गळ्यात
पाणी डोळ्यांत थांबले

नको नवे बंध म्हणता
पाश गुंफत राहिले
रात्र सरली बेधुंदिची
स्वप्न रंगत राहिले

जीव गुंतला असा
की मागे काही ना राहिले,
मन मारी भराऱ्या पिंजऱ्यात
पंख बंदच राहिले
- भावीन

No comments: